राहुल जगताप यांची श्रीगोंद्यात भव्य सभा: हजारोंच्या उपस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीची सुरुवात..

दिनांक २९ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या विधानसभा निवडणुक प्रचाराची सुरुवात आज हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत झाली. संत शेख महंमद बाबा यांच्या दर्ग्याच्या पटांगणात झालेल्या या जाहीर सभेत विविध नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त करत जगताप यांच्या विजयासाठी आग्रह धरला. सभेचे अध्यक्ष पद  केशव भाऊ मगर यांनी भूषवले.

याप्रसंगी दीपक भोसले यांनी बोलताना राहुल जगताप यांच्या कार्याची प्रशंसा केली. भोसले म्हणाले, “आमची लढाई कोणत्याही दिग्गज नेत्यांशी नाही, तर श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनतेला योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आहे.” त्यांनी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यावर टीका केली आणि तालुक्यातील मूलभूत सुविधांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले.

रंगनाथ निवसे यांनी राहुल जगताप यांच्या विजयासाठी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले. “नगर तालुक्यातील गट सांभाळून मोठा मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन देत राहुल जगताप यांचे नेतृत्व जनतेसाठी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

राहुल जगताप: “मी श्रीगोंद्यातील जनतेसाठी लढणार”..

यावेळी राहुल जगताप यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “मी स्वतः उमेदवारी अर्ज भरलेला नाही, तर श्रीगोंद्यातील जनतेने तो अर्ज भरला आहे,” असे ते म्हणाले. दोन राष्ट्रवादी पक्षांत फूट पडली असताना पवार साहेबांची निष्ठा कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि श्रीगोंदा तालुक्याच्या जनतेसाठी पूर्ण विश्वासाने काम करण्याची तयारी दर्शवली.

ते पुढे म्हणाले, “यावेळी मी वरिष्ठ नेत्यांचे फोन उचलणार नाही आणि या निवडनुकित मागे घेणार नाही. माझ्यासमोर दोन महिला उमेदवार आहेत, एक आईसमान आणि दुसरी मोठ्या वहिनी समान, मात्र ही निवडणूक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि शरद पवारांच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच स्वर्गीय बापू आणि तात्या यांच्या निष्ठेची ठरणार आहे.”

या सभेमध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सकलेन शेख, अतुल लोखंडे, सागर बोरुडे, सुनील घोडके, गौतम घोडके, प्राध्यापक मांडे, बाबासाहेब इथापे, दीपक भोसले, अख्तर शेख, हरिदास शिर्के, श्याम जरे, माणिक पाचपुते, स्मितल भैया वाबळे, उत्तम डाके, शंकर पाडळे, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप, मिलिंद भोईटे, संजय जामदार यांच्या सह बरेच पदाधिकारी उपस्थित होते. यातील काही कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले आणि जगताप यांना विजयासाठी पाठिंबा दर्शवला.

शहरातून काढण्यात आलेली रॅली..

नारळ फोडून शुभारंभ..

कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव भाऊ मगर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

स्रोत: (आयोजित सभा)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading