दिनांक १७ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत श्रीगोंदा/नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारास पाठिंबा देत आहेत. परंतु, याच मतदारसंघात राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय पक्षशिस्तीला विरोधाभासी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कठोर पाऊल उचलले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी आज अधिकृत पत्राद्वारे राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले.
या पत्रात त्यांनी नमूद केले की, “श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारी करणे हा पक्षशिस्तीचा भंग असून, अशा कृत्यांमुळे पक्षाच्या हिताला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे पक्षाकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात येत आहे.”
या निर्णयाची प्रत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे पाठवण्यात आली असून, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)




