अनुराधाताई नागवडे यांना विजयी करण्याचा निर्धार..

दिनांक १६ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक व सेवानिवृत्त सेवकांच्या स्नेह मेळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीत सौ. अनुराधाताई नागवडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा मेळावा शुक्रवारी (दि. १५) सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आला होता.

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित माजी संचालक व सेवानिवृत्त सेवकांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला. त्यांनी सौ. अनुराधाताई नागवडे यांना विधानसभेत निवडून पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या शिकवणीचा पुनःप्रत्यय दिला. “बापूंनी दिलेली नैतिक मूल्ये आणि संस्कारांचा वारसा आजतागायत आपल्या पाठीशी आहे. या शिकवणीमुळेच प्रत्येक कामगाराचा संसार आनंदाने फुलला आहे. समाजाशी निर्माण झालेला ऋणानुबंध अखंड राहील, हीच खरी बापूंच्या शिकवणीची ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी संचालक युवराज चितळकर, जिजाराम खामकर, प्रा. सुनील माने, अॅड. अशोक रोडे, सुनील भोस, हेमंत नलगे, अशोकराव काळाने, आबासाहेब कोल्हटकर यांसह उपस्थित मान्यवरांनी सौ.अनुराधाताई नागवडे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला माजी संचालक सचिन कदम, रंगनाथ कुताळ, गोपीचंद इथापे, प्रेमाकाका भोईटे, प्रा. धर्मनाथ काकडे, मुरलीधर भोस, विलास नाना काकडे, दादासाहेब बांदल, वसंतराव गिरमकर, विठ्ठल आप्पा नागवडे, भुजंगराव नागवडे, आप्पासाहेब शेळके, किसनराव लकडे यांच्यासह सेवानिवृत्त कामगार आणि अधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading