धनगर समाज नागवडे यांच्या सोबत: कोल्हटकर..

दिनांक १५ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

गेल्या चाळीस वर्षांत श्रीगोंदा तालुक्यातील विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते यांना मोठी संधी मिळाली, मात्र विकासाचा अभाव जाणवला, असे आरोप करत धनगर समाजाने या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काष्टी येथील सभेत बोलताना स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक आबासाहेब कोल्हटकर यांनी आमदारपुत्र विक्रम पाचपुते यांच्यावर टीका करत, “परिवर्तन अटळ आहे, आता तालुक्याला सक्षम नेतृत्व हवे,” असे सांगितले. धनगर समाजाचे कार्यकर्ते गावोगावी फिरून नागवडे यांच्या प्रचारासाठी काम करत असून, त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.

स्रोत:(पत्रकार दत्ता पाचपुते)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading