फेक अकाउंटद्वारे महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर बदनामी, समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार..

दिनांक १८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्याविरोधात फेक सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून बदनामी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

श्रीगोंद्याचे ग्रामदैवत महंमद महाराज पटांगण येथे अपक्ष उमेदवाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे थेट प्रक्षेपण सी न्यूज या चॅनेलवर करण्यात आले. प्रक्षेपण सुरू असताना “नागवडे पॅटर्न” (Nagawde pattern) या नावाने चालवल्या जाणाऱ्या फेक अकाउंटवरून समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्या. यामध्ये “माळी पाडा ओनली मराठा” अशा वादग्रस्त टिप्पणीचा समावेश आहे.

तक्रारकर्ते एम डी शिंदे (रा. श्रीगोंदा) व कृष्णा नागवडे (रा. वांगदरी) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सदर फेक अकाउंटचा आणि या टिप्पण्या करण्याचा सौ. अनुराधा नागवडे व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी काहीही संबंध नाही. हा प्रकार विरोधकांनी राजकीय हेतूने केला असून नागवडे यांच्या प्रतिमेवर वाईट परिणाम करण्यासाठी आणि समाजात तणाव निर्माण करण्यासाठी हा कट रचला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदन देताना एम डी शिंदे, कृष्णा नागवडे, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते.

स्रोत:(तक्रारी अर्ज)

अशा मजकूरचा वापर करण्यात आला..
जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading