दिनांक, १५ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. सिंचन योजनांचे अपूर्णत्व, बेरोजगारीवर तोडगा काढणारे औद्योगिक विकास केंद्र (एमआयडीसी) योजना, डिंबे माणिक डोह जलप्रकल्प, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा तालुक्यातील अंमलबजावणीतील अभाव हे प्रलंबित प्रश्न सत्ताधारी घराणेशाहीमुळे दुर्लक्षित राहिल्याचे स्पष्ट होत आहे.
श्रीगोंदा तालुका अनेक दशकांपासून प्रस्थापित कारखानदार घराण्यांच्या नियंत्रणाखाली राहिला आहे. हे राजकारणी सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी दल-बदल, पक्षांतर, आणि आपल्या स्वार्थासाठी ठेकेदारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहेत. विकासकामांचे ठेके मिळवून पैसा कमवणे आणि लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, ही राजकीय संस्कृती तालुक्यात रुजल्याचे चित्र आहे.
विशेषतः डिंबे माणिक डोह जलप्रकल्प, सिंचन योजना, व रोजगारनिर्मितीच्या योजना ठप्प असल्याने तालुक्यातील सामान्य शेतकरी आणि कामगार वर्गाला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना देखील अपूर्ण राहिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.
सत्तेच्या या नाट्यात सामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. घराणेशाहीच्या दडपणाखाली असलेल्या कारखानदार आणि राजकारण्यांच्या राजकीय खेळांमुळे सामान्य जनता संभ्रमित झाली आहे. राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर करणारे नेते आणि त्यांच्या पाठोपाठ स्थलांतर करणारे कार्यकर्ते यामुळे तालुक्यात राजकीय अस्थिरता वाढली आहे. या सर्व घडामोडींमुळे मतदारांमध्ये प्रस्थापित राजकीय नेतृत्वाबद्दल प्रचंड असंतोष आहे.
अण्णासाहेब शेलार – नवीन पर्याय उभा करत आहेत..
श्रीगोंदा/नगर मतदारसंघातील ओबीसी समाजाच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब शेलार यांना नवीन राजकीय पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी मागासवर्गीय, गरीब मराठा, मुस्लिम, धनगर आणि इतर अल्पसंख्याक समाजाला संघटित केले आहे. अण्णासाहेब शेलार हे केवळ ओबीसी समाजाचे नेतृत्व करत नाहीत, तर तालुक्यातील सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर खंबीरपणे उभे राहत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, श्रीगोंदा तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाही आणि त्यांचा सत्तेचा गैरवापर पाहता, जनता आता बदलाची मागणी करत आहे. अण्णासाहेब शेलार यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे.
सिंचन, पाणीपुरवठा, रोजगार, आणि कल्याणकारी योजनांचा अभाव यामुळे श्रीगोंदा मतदारसंघातील जनता वैतागली आहे. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला विरोध म्हणून अण्णासाहेब शेलार हे नवीन नेतृत्व म्हणून उभे राहत असून, सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होत आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा बदल प्रत्यक्षात येईल का,..? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्रोत: (मिळालेल्या माहितीनुसार)




जाहिरात…
