राहुल जगताप : “अपक्ष निवडून आल्यावर शरद पवार यांच्याकडेच जाणार”..

दिनांक १८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, त्यांच्या पक्ष निलंबनाला फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले. अपक्ष निवडून आल्यावर शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सभेत जगताप यांनी विरोधकांच्या उमेदवारीवर टीका करत, “मी जनतेचा हट्ट आहे” असे ठामपणे सांगितले. आपल्या आईची शपथ घेऊन विकासकामांमध्ये कसलीही टक्केवारी न घेण्याचे वचन दिले.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि घनश्याम शेलार यांच्यावर त्यांनी व त्यांच्या मातोश्रींनी टीका केली. तसेच, टिळक भोस यांनी भाजप उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

सभेत विविध मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी तर प्रस्तावना हरिदास शिर्के यांनी केली. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

स्रोत:(सांगता सभा)

जाहिरात..
सांगता सभेसाठी उपस्थित जनसमुदाय..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading