दिनांक २९ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजी. शामभाऊ जरे यांनी इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसून आपल्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या टाटा टीगोर गाडीचे नुकसानीबाबत द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम रजिस्टर केला होता. गाडीचे स्पीड ब्रेकरवर धडक लागल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने हा क्लेम करण्यात आला होता. परंतु कंपनीकडून प्रत्यक्ष गाडीची पाहणी न करता, ऑनलाईन तपासणीच्या आधारावर क्लेम नाकारण्यात आला, यामुळे जरे यांनी कंपनीच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

शाम जरे यांनी संबंधित क्लेम जेन्यून असल्याचे सांगत कंपनीला लेखी पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी, क्लेम मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. परंतु, कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिनांक २९ ऑक्टोबर रोजी जरे यांनी श्रीगोंदा येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिससमोर उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनात त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी कंपनीच्या निष्काळजीपणाला वाचा फोडली.
जरे यांच्या या ठाम आंदोलनाची दखल घेत श्रीगोंदा शाखाधिकारी साठे साहेबांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि क्लेम मंजूर करत असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. यामुळे जरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आणि साठे साहेबांचे आभार मानले.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




