#Shrigonda Crime News.. लोखंडी कत्तीचा धाक दाखवुन लाखोंचे सोन्याचे दागीने अंन रोख रक्कम चोरी.. अज्ञात इसमांवर दरोड्याचा गुन्हा दाखल..

दिनांक ९ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४:०० वाजनेच्या सुमारास फिर्यादी विमल दशरथ शिर्के, वय – ५७ वर्षे, धंदा – घरकाम, शेती, रा. शिरसगांव फाटा, मेजवाणी हॉटेल जवळ, शिरसगांव बोडखा, ता. श्रीगोंदा येथील राहते घरी तीन तोळे वजनाचा गंठण, आर्धा तोळे कानातील टॉप्स, दीड तोळ्यांचा गंठण, अर्धा तोळे सोन्याचे मनी व २० हजारांची रोख रक्कम असा १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल ज्यात सोन्याचे दागीने व रोख रक्कम दोन अज्ञात चोरटयानीं घराचे दरवाजाचा कडी कोंडा तोडुन आत घुसुन फिर्यादीस लोखंडी कत्तीचा धाक दाखवुन व लोखंडी कत्तीची मुठीने मारुन बळजबरीने चोरुन नेले. वगैरे पिडीताचे फिर्यादीनुसार भादवी कलम ४५७, ३९४ व ३४ नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी पोलीस उप विभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी भेट दिली असून, नमूद प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर के शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अजय गोरड करीत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading