दिनांक ५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील लिंपनगाव येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पांडू पुनाजी मावळी, वय- ३६ वर्ष, कनिष्ठ अभियंता, वर्ग- ३ म.रा.वि.वि कं, लिंपनगाव (काष्टी २ सेक्शन) श्रीगोंदा राहणार शिवाजीनगर, दौंड रोड, श्रीगोंदा, जि.अहमदनगर. याला १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेने व ती स्वीकारल्याने लाप्रवीच्या अहमदनगर युनिटने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, लिंपनगाव ग्रामपंचायत चे विद्युत बील थकलेले असलेमुळे म.रा.वि.वि कंपनी कडून ग्रामपंचायतचे विद्युत कनेक्शन तोडले होते. आरोपी लोकसेवकाने विद्युत कनेक्शन तोडल्यामुळे गावाचा पाणिपुरवठा बंद होत असल्याने तक्रारदार यांनी यातील आरोपी लोकसेवक यांची भेट घेऊन, विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करुन देणेबाबत विनंती केली असता, आरोपी लोकसेवकाने त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून, आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवकाने १५ हजारांची मागणी पंचासमक्ष करून, सदर लाच रक्कम आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष हॉटेल श्रावणी, लिपंनगाव येथे स्विकारली. त्या दरम्यान आरोपी लोकसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरील कारवाई सापळा अधिकारी हरीष खेडकर, (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अ’नगर) यांचे सह सापळा पथक (पो नि. पुष्पा निमसे), (पो हवा.) संतोष शिंदे, विजय गंगुल, रमेश चौधरी, (पो. अंमलदार), रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, संध्या म्हस्के. चालक (पो हवा) हरुन शेख, राहुल डोळसे. यांनी मा.श्री सुनील कडासने सो (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) व मा.श्री सतिश भामरे (प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.) यांचे मार्गदर्शना खाली केली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७ @ टोल फ्रि क्रं. १०६४
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

