दिनांक १७ डिसेंबर, अ.नगर:
जमिनीच्या फेरफार प्रकरणात निकालाची प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्विकारताना श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वर्ग ३ लघुलेखक शैला राजेंद्र झांबरे (रा. दुर्वांकुर, नित्यसेवा सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने निकालाच्या आदेशाची प्रत मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यावर झांबरे यांनी दहा हजारांची मागणी केली. तर त्यापैकी ४ हजार रुपयांची रक्कम दिनांक १६ रोजी घेतली होती. उरलेली रक्कम आदेशाची प्रत देताना देण्यास ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा लावून श्रीगोंदा तहसील कार्यालयात झांबरे यांना लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. एसीबी नगरचे पोलिस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
