११ ते १८ वयोगटातील मुलींचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रशिक्षण शिबिर संपन्न..

दिनांक १७ डिसेंबर,श्रीगोंदा:

ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस अहमदनगर चॅप्टर वतीने नुकतेच श्रीगोंदा येथे ११ ते १८ वयोगटातील मुलींचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्त्री सशक्तीकरण सल्लागार मनीषा काळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी मुलींना कळत नकळत जाणवणारे धोके, अत्याचार याबाबत प्रबोधन केले. तसेच, मुलींच्या प्रश्नांना उत्तरे देत विनयभंग अथवा रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी त्रास दिल्यास विविध टोल फ्री नंबर बाबत माहिती दिली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आयोजक प्रशांत सिदनकर, चैतन्य पोटे आणि शरद चव्हाण यांनी शहरी व ग्रामीण भागात शाळकरी विद्यार्थिनी व घरेलू कामगार वर्गात मोडणाऱ्या अल्प शिक्षित मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते.यासाठी शासनाने कायदे बनविले.परंतु, याबाबत पिडीतांना माहिती नसल्याने. तसेच, कुटुंब,समाज काय म्हणेल? या विचाराने किंवा अज्ञान पणामुळे त्या बाहेर सांगत नाहीत.त्यांना याबाबत बोलते करत वेळीच कारवाई व्हावी.या हेतूने आपण संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले.

यावेळी रामदास नन्नवरे, सहदेव निंभोरे, शिवाजी पोटे, दिगंबर लोखंडे आदी सह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रशांत सिदनकर यांनी केले. तर, आभार चैतन्य पोटे यांनी मानले.

स्रोत:(प्रशांत सिदणकर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading