श्रीगोंद्यातील त्या राज..कारण्याचा कार्यकर्त्यांसमवेत भटके विमुक्त समाजाच्या घरावर हल्ला..! दोन लोकांसह चार महिलांना साड्याफाटू पर्यंत मारहाण..? पी आय साहेब श्रीगोंद्याचा बिहार झालायं काय..?

दिनांक १५ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यांत सगळीकडे यात्रा, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी मोठ्या संख्येने आणि लोकसहभागातून पार पडत आहेत. अनेक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी साजरे होताना Dj, मिरवणुका, ऑर्केस्ट्रा, तमाशा अश्या पद्धतीने आनंद व्यक्त होताना दिसतो आहे. त्यातच या कार्यक्रमांत किरकोळ कारणावरून वाद होणे नवीन नाही. असाच एक वादातीत प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये झाला असुन, एका दिग्गज राजकारण्याने स्वतः कार्यकर्त्यांसह संशयित व्यक्तीच्या घरी हमला करून गज, काठ्या, लाठ्यानी घरात घुसून दोन इसमांसह चार महिलांना साड्यासह अंगावरील वस्त्र फाटेपर्यंत मारहाण केली असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

सविस्तर असे की, श्रीगोंदा शहराच्या पश्चिमेस १७ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या गावात देवीचा यात्रा उत्सव होता. येथे एकाच देवीचे दोन देवस्थान आहेत. त्यामूळे दोन्ही ठिकाणीं यात्रेची लगबग आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. काल दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी हगामा झाल्यानंतर रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात तालुक्यातील दिग्गज राजकारणी आणि समाजात राजा सारख वावरणारं व्यक्तिमत्त्व उपस्थित होत.

या कार्यक्रमात काही तरुणांकडून दंगा होत असल्याचे पोलिसांना जाणवले, त्याबाबत पोलीसांनी सूचना केल्या, तर येथे सहभागी तरुणांची पोलिसांसोबत हुज्जत झाली. यावेळी किरकोळ गदारोळ झाला आणि त्यात त्या पुढाऱ्यांने हस्तक्षेप केला. मात्र, गर्दित किरकोळ धक्का बुक्की होत नेत्याचा शर्ट फाटला. पुढे राग अनावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या या राजाने भलतेच महाभारत केले..

नेत्याच्या थेट कॉलरला हात घालणारा तरुण कोण..?
ज्या तरुणावर संशय घेतला त्याला शोधण्यासाठी नेते आपल्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन रात्री १:०० वाजनेच्या दरम्यान येथील भटके विमुक्त समाजाच्या वस्तीवर पोहचले. घरच्यांकडे विचारपूस केली. तर, तो तरुण घरी नसल्याचे समजले. आणि मंग नेत्यांचा संयम सुटला.. त्यांनी घरच्या वडीलधारी माणसांना व महिलांनावरच राग व्यक्त केला. यात पीडितांना कोरकोळ लागले असुन, महिलांचा साड्या आणि वस्त्र फाटले असल्याचे समजते आहे. त्या दोन लोकांना गाडीत डांबून घेऊन जातांना गावातील लोकांना समजल्यावर गाडी अडवत त्यांची या पुढाऱ्याच्या तावडीतून सुटका झालीय.

श्रीगोंद्याच बिहार झालंय काय..?
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असुन, संयमी, शांत, दिलेला शब्द पाळणारा राजकारणी अशी ओळख असलेल्या या राजकीय नेत्याच्या अश्या कुख्यात कृत्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असंवेदनशील जमाव घेऊन मध्यरात्री लोकांच्या घरी जात थेट लोकांना व महिलांना साड्या फाटू पर्यंत मारहाण करने कोणत्या राजकीय अजेंड्याचा भाग आहे.? असा सवाल विचारला जात आहे.

त्यातच तालुक्यांत काल रात्रीतून टाकळी कडेवळी येथे झालेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असुन, लोणी व्यंकनाथ येथे रस्त्यावर गाडीचा कट लागला म्हणून, भिगवन येथील तरुणांना जबरी हनामार झाली आहे. यात उप सरपंचालाही मारहाण झाल्याचे समजते आहे. आणि त्यातच राजकीय नेत्याने मध्यरात्री भटके विमुक्त समाजाच्या घरी जाऊन केलेला नंगा नाच.. या प्रकरणात काहीतरी वेगळं राज… कारण निर्माण करीत आहे. ऐन लोकसभा निवडणुक आचार संहितेच्या कालखंडात अशी प्रकरण घडत असताना स्थानिक पोलीस यंत्रणेचा अभाव मात्र स्पष्ट जाणवतो आहे.. तर, एकीकडे श्रीगोंद्याच बिहार तर झालं नाही ना..? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply