दिनांक २८ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
दोन दिवसांपासून सकाळची सुरुवात एका गंभीर चर्चेने सुरु होत असल्याचे दिसून आले आहे. काल श्रीगोंदा शहरालगत असलेल्या पेडगाव रोडवरील एका हॉटेलवर कॉलेजची तरुणी एका इसमासोबत हॉटेलमध्ये आढळून आली. स्थानिकांच्या मदतीने येथील सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अरविंद कापसे आणि नाना शिंदे यांनी त्यांची चौकशी केली. तर, ती मुलगी अल्पवयीन असुन, त्या इसमासोबत शरीर संबंधासाठी येथे आल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी कापसे व शिंदे यांनी त्या मुलीचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीगोंदा शहरातील काही महिलांनी स्थानिकांच्या पुढाकाराने संशयित हॉटेलवर गोपनीय कारवाई केली. यावेळी आढळून आले की, बाहेर गावाहून आलेल्या काही महिला येथे देहविक्री करत आहेत.
याबाबत स्थानिक प्रशासनास माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून सकारात्मक पाऊल उचलली गेली नाहीत. संतप्त नागरिकांनी या महिलांना उपस्थित महिलांच्या मदतीने श्रीगोंदा पोलीसांच्या स्वाधीन केले. आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या समोरं श्रीगोंदा पोलीस कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांचा पाढा वाचला. जुगार, मटका, ताडी, दारू, हातभट्टी, बिंगो, ड्रग, नशेली पदार्थ, मजनुगिरी, वाळू, मुरूम, माती तस्करी, अनधिकृत वाहतूक, ऑनलाईन मटका, सायबर कॅफे, कॉफी बार, टूकारांचा हैदोस.. सह देहव्यापार करणाऱ्या महिला व वेश्यालय चालवणारे यांच्यावर कायदेशिर कारवाईबाबत प्रशासनाची हतबलता व्यक्त करत सकारात्मक कारवाईची मागणी केली. पण, पोलीस निरीक्षक भोसले यांनी उपस्थितांना कायद्याची चाकोरी सोडून कामं करता येत नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर तरुणांच्या पुढाकाराने अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शेख महमंद बाबा दर्गाहात बैठक आयोजित करण्यात आली. यासाठी मोठया संख्येने तरुणांनी व समविचारी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत आपली भुमिका नमूद केली. यावेळी सर्वानुमते विविध मुद्यांवर चर्चा होऊन. अवैध धंदे बंद करण्यासाठी आंदोलनात्मक भुमिका घेण्याचे निश्चित झाले. तर, यासाठी एका कृती समितीची आखणी करण्यात आलीय. शेकडोंच्या संख्येने श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोरं व्यापक स्वरूपात आणि संविधानिक मार्गे अवैध धंदे मुक्त शहर करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. उद्या विविध मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. “आमचे गाव गलिच्छ व्यवसाय मुक्त व आदर्श गाव” म्हणुन सर्वत्र चर्चिले जावे..! अशी अपेक्षा अनेकांनी याठिकाणी व्यक्त केली.
देह विक्रीसाठी महिलांवर कसलाही दबाव नाही..: चालक..
या प्रकरणानंतर शहरातील एका वेश्यालय चालकास या घटनेविषयी माहिती विचारली असता, त्याने आम्ही कोणत्याही महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत नाही. त्या आपल्या स्व:इच्छेने हा उद्योग करतात.. मी शासनाच्या निकषात राहुन हा धंदा चालवतो. माझ्याकडे एकही अल्पवयीन मुलगी नसुन, सर्व महिला वयोगट ३० ते ६० वर्षाच्या दरम्यानच्या आहेत. कोणाची हरकत असल्यास प्रशासनाने योग्य ठिकाणी गावाच्या बाहेर जागा द्यावी.. असे त्या चालकाने माध्यमांना सांगितले आहे.
श्रीगोंदा शहरातील देहव्यापार प्रकरणात दोषी कोण..?
देहविक्री करणे हा कायद्याने अपराध नाही.. मात्र, त्याचे व्यवसायात रूपांतर करणे.. महिलांना किंवा अल्पवयीन मुलींना देह विक्रीसाठी प्रवृत्त करणे.. सक्ती करने.. हे अपराधिक कृत्ये असुन, यात महिलांच्या शोषणाला कारणीभूत वेश्यालयांचे चालक हे कायद्याने दोषी असुन, पोलीसांच्या अधिकार क्षेत्रात चाललेल्या अनधिकृत चकला चालकांवर कारवाईची जबाबदारी पोलीस बीट अंमलदारासह पोलीस निरीक्षकांची आहे. परंतु, श्रीगोंद्यात पोलीस इतर अनधिकृत धंद्याप्रमाणे वेश्यालयांनाही अभय देत असल्याने, तरुणांच्या आंदोलनाचे गांभीर्य वाढत असुन, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
स्रोत:(आयोजित बैठक व मिळालेल्या माहितीनुसार)
