श्रीगोंद्यातील या ATROCITY च्या गुन्ह्यात बड्या नेत्याचा हस्तक्षेप..! पोलीसांवर दबाव..? अल्पवयीन मुलीवर सलग ६ वर्षापासून होत होता अत्याचार.. आरोपी अटकेसाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात निषेध सभा..

दिनांक २८ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील एका गावात वरच्या जातीचा माज असलेल्या नराधमाने तेथील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक आणि शाररिक अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा शहरातील होनराव चौक येथे घडली आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज डांगे या इसमावर भादवी कलम ३७६, ४१७, ३२३, ५०४, ५०६, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२), ३(२)(v)(a), ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(w)(i), सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासुन संरक्षण कायदा कलम ८ व १२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मागासवर्गीय संघटनांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोरं निषेध सभा घेतली. बहुजन समता पार्टीचे राज्य पदाधिकारी वसंतराव सकट यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शेकडो महिलांसह समाज बांधव यावेळी उपस्थित होते. तर, मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व तहसीलदार वाघमारे मॅडम यांना देण्यात आले.

सभेत नमूद घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील पोलीस यंत्रणा सक्षम पद्धतीने कामं करित आहे. मात्र, त्यांच्यावर एका बड्या नेत्याचा दबाव असुन, आरोपी अटकेसाठी तो नेता नमूद प्रकरनात हस्तक्षेप करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सकट यांनी सभेस संबोधित करताना सांगितले की, मातंग समाज स्वाभिमानी झाला आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा. आमच्या रणरागिणी घरात बसणार नाहीत. या आंदोलनाची तीव्रता वाढवुन जश्यास तसे उत्तर दिले जाईल. जनावरांची कातडी सोलनारी आमची जात आहे. आमच्या संयमाची परीक्षा कोणीही पाहू नये. असे त्यांनी नमूद केले.

एखाद्या नेत्याने आरोपीची बाजु घेतल्यास.. त्या नेत्याला तालुक्यात फिरू देणारं नाही..!  असे आवाहन यावेळी आंदोलनात व्यक्त करण्यात आले. गुन्हा दाखल होऊन ६ दिवस उलटले तरी, आरोपी अटक झालेला नाही. आरोपीला तात्काळ अटक करावी. आमचा अंत पाहू नये. पीडितेला या प्रकरणी न्याय मिळवुन द्यावा. अशी भावना व्यक्त करण्यात आली.

नेत्यांना मागासवर्गीयांची मत चालतात.. मात्र, अश्या घटनांत ते आरोपींच्या बाजूने उभे राहतात. मागील काही प्रकरणांत असे समोरं आले आहे की, महिला किंवा अल्पवयीन मुलींचे लैंगिक, शाररिक, मानसिक छळवणूक प्रकरण वाढतं आहेत. पिडीतेला लग्नाचे, प्रेमाचे आमिष दाखवून शोषण केले जाते. आणि इच्छा पूर्ती झाली की, त्या पिडितेंची अवहेलना होते. समजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. यातुन सावरून पीडित कुटुंब पोलिसात तक्रार देते किंवा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, स्थानिक राजकारणी, नेते, पुढारी यात संबंधित आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांवर किंवा प्रशासनावर दबाव टाकतात. मागील काही घटनांमध्ये शोषण झालेल्यांचा आवाज दाबण्यासाठी समाजातील काही दलाल बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने पैश्याने पिडितेचं तोंड बंद करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते आहे.

शक्यतो आर्थिक दुर्बल महिला व मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकतात, वरच्या जातीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि शाळा, महाविद्यालयांपासुन, सामन्यत: बुलट, ktm, महागड्या गाड्या, आलिशान राहणीमानाचा आव आणून सामन्यांना त्यांच्या वश मध्ये करण्याचा नवा डाव या उच्चब्रु समाजात विकसित होत चालला आहे. आणि याचं बडेजाव पनाच्या विळख्यात सामान्य, आर्थिक दुर्बल महिला व मुली यांच्या प्रेमाच्या व लग्नाच्या अमिषाला बळी पडत आहेत. बऱ्याच घटनांत पुरुष विवाहीत आहे. त्याला मुलं आहेत. आणि तो शाररिक शोषणाच्या प्रकरणाचा आरोपी आहे. आणि यांना कायदेशिर कारवाई तून वाचवण्यासाठी पांढरपेशी नेते, राजकारणी पुढाकार घेताना समोरं येत आहेत.. त्यांना मागासवगीर्य, पिछड्या, वंचित समाजाची मतं चालतात.. परंतु , ऐनवेळी ते मागास प्रवर्गातील लोकांच्या विरोधात आरोपींची मदत करतात.. असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

स्रोत:(निषेध सभा व अधिकृत माहिती नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading