दिनांक २७ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ११:३० वा. ते ११:५० वा. दरम्यान पारगांव फाटा, पारगांव, ता श्रीगोंदा येथे श्री.जरांगे पाटील यांचे आव्हानानुसार सकल मराठा समाज श्रीगोंदा यांचे वतीने सकल मराठा समाज श्रीगोंदा यांचे कार्यकर्ते १. देवराम घोगरे रा.महांडुळवाडी, ता.श्रीगोंदा २. मारुती सुंबे रा.बेलवंडी कोठार ता.श्रीगोंदा ३. सुदाम कुटे रा.अजनुज ता.श्रीगोंदा ४. पुष्कर अशोक आमटे रा.श्रीगोंदा ५. संतोष जगन्नाथ जाधव रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा ६. संग्राम पवार रा.बेलवंडी ता.श्रीगोंदा व इतर २५ ते ३० जणांनी पारगांव फाटा, येथे अहमदनगर कडुन दौंडकडे जाणारा – येणारा हायवे रोड अडवुन राज्यातील, परराज्यातील व श्रीगोंदा तालुक्यातील तसेच शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग, शेतकरी इत्यादींचे नेहमीचे येण्याजाण्याचे मार्गावर बसुन रस्ता अडवुन त्यांचे दैनिक काम, व्यवसाय, व्यापार, करण्यास प्रतिबंध करून त्यांची गैरसोय केली.
तसेच रहदारीच्या रस्त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याना थांबवुन रस्त्यावर घोषणाबाजी करून रस्त्यावरील येणा-या जाणा-या लोकांना वेठीस धरले व शांततेचा भंग केला आहे. त्याचबरोबर मा.जिल्हाधिकारी सो.अहमदनगर यांच्या आदेशान्वये दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ते दिनांक १ मार्च २०२४ रोजी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश असताना आदेशाचे उल्लंघन केले वगैरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन गोरे यांच्या फिर्यादी वरून वरील नमूद इसमांवर भादवि कलम ३४१ सह महा पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३),१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच बरोबर पोलीस कॉन्स्टेबल संभाजी घोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकल मराठा समाज घोगरगांव यांचे वतीने श्री.ज्ञानेश्वर माणिक बोरुडे रा.घोगरगांव, ता.श्रीगोंदा यांचे नेतृत्वाखाली सकल मराठा समाज घोगरगांव यांचे कार्यकर्ते १. दयानंद शंकर शेळके रा.घोगरगांव ता.श्रीगोंदा २. बाळासाहेब श्रीरंग उगले रा.थिटेसांगवी ता.श्रीगोंदा ३. राजेंद्र माणिक गुंजाळ रा.घोगरगांव ता.श्रीगोंदा ४. हरी बबन बेरड रा.घोगरगांव ता.श्रीगोंदा ५. दिपक कचरु उल्हारे रा.घोगरगांव ता.श्रीगोंदा ६.अंकुश वाळके रा.थिटेसांगवी ता.श्रीगोंदा ७. भुषण उदरे रा.निमगांव गांगर्डा ता.कर्जत व इतर १५ ते २० यांनी कोंभळी फाटा, घोगरगांव, ता.श्रीगोंदा येथे अहमदनगर कडुन सोलापुर जाणारा व येणारा हायवे रोड अडवल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्रोत:(फिर्याद)
