दिनांक २६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
येथील अग्नीपंख फौंडेशनने एक मुठ धान्य अनाथांसाठी हा उपक्रम काही शाळा विद्यालयात राबविला आणि ६५ क्विंटल गहु, तांदुळ, बाजारी, ज्वारी धान्य जमा झाले आहे. आदर्श सायकल पटू स्व. डॉ संजय काळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्रीगोंदा ते भुलेश्वर ९० किमीची सायकल वारी काढून, सार्थक वसतीगृहास पाच क्विंटल धान्य सुपूर्त केले आणि वसतीगृहातील चिमुकल्यांना धान्याची शिदोरी पोहच करण्यात येत आहे.
अग्नीपंख फौंडेशनने कोरोना महामारी पुर्वी दोन वर्षे एक मुठ धान्य अनाथांसाठी हा उपक्रम राबविला होता. यातुन राज्यातील २२ वसतीगृहांना मदत केली होती. या वर्षी पासून पुन्हा हा उपक्रम सुरु केला आहे.
आंबळे येथे झालेल्या धान्य प्रदान कार्यक्रमात सार्थकचे अध्यक्ष डॉ. अनील रामलाल कुडीया यांना गटविकास अधिकारी राणी फराटे यांचे हस्ते अग्नीपंखचा अनाथांचा नाथ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राणी फराटे म्हणाल्या की, अग्नीपंख फौंडेशनचा एक मुठ धान्य अनाथांसाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी डॉ. उमेश हांडे, नवनाथ दरेकर, मिठू लंके, भाऊसाहेब खेतमाळीस, सुरेश खामकर, शरद मचाले, छाया भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमांसाठी शाळा, विद्यालयांबरोबर आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता बाबर, राज्यपालांचे स्वीय सहायक अरुणराव आनंदकर, नवनाथ दरेकर, अनीलमामा पाचपुते, सोमा इथापे, बाळासाहेब दांगट, मिलिंद भोयटे, किसन वऱ्हाडे, समीर बोरा, भाऊसाहेब खेतमाळीस, मनोज जगताप, संपत विधाते यांनी धान्य रुपी सेवा दिली.
सहभागी झालेल्या शाळा
जि. प. शाळा मुले /मुली श्रीगोंदा,
जि. प. शाळा हिरडगाव,
जि. प. शाळा संतवाडी, काष्टी,
संत निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला देवदैठण,
श्री व्यंकनाथ विद्यालय लोणीव्यंकनाथ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी,
यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव,
इंदीरा गांधी विद्या निकेतन श्रीगोंदा फॅक्टरी,
डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक,
महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा,
कन्या विद्यालय श्रीगोंदा,
ज्ञानदीप श्रीगोंदा श्री स्वामी समर्थ श्रीगोंदा,
होनराव विद्यालय श्रीगोंदा..
मदतीसाठी निवडलेल्या संस्था
स्नेहालय अहमदनगर,
अनाम प्रेम अहमदनगर,
मानवसेवा प्रकल्प अरणगाव,
सार्थक सेवा संघ आंबळे पुरंदर,
महामानव बाबा आमटे श्रीगोंदा,
महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव,
राहुल वसतीगृह श्रीगोंदा,
अविश्री बालसदन दौड,
प्राजक्ता मुकबंधीर सुपे,
संकल्प वसतीगृह राशीन,
स्नेहप्रेम वसतीगृह कर्जत,
मनःशांती वसतीगृह शिरुर,
बाल वारकरी संस्था टाकळी लोणार,
बाल वारकरी संस्था मुळेवाडी कर्जत,
दिपस्तंभ मनोबल पुणे,..
फोटो:आंबळे ता पुरंदर येथील सार्थक सेवा संघास धान्य सुपूर्त करताना गटविकास अधिकारी राणी फराटे व आदि दिसत आहेत.
