मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत खोमणेमळा शाळा तालुक्यात अव्वल..

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मुख्यमंत्री स्वच्छ शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील खोमणेमळा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेत तसेच खाजगी शाळेत राबविले जात असलेले वृक्षारोपन, संवर्धन, भौतिक सुविधा, तज्ञांची व्याख्याने, आरोग्य तपासणी, स्वच्छताविषयक सवयी, स्वच्छता मॉनिटर, मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभाग, स्पर्धा परिक्षेतील यश, शालेय व्यवस्थापन समिती सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवत्ता, प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत आहारात परसबागेतील भाजीपाला वापर तसेच पूरक आहार आदि उपक्रमांत शाळेने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यातून तालुक्यातील शाळांचे क्रमांक काढण्यात आले. या सर्व उपक्रमात तालुक्यातून प्रथम क्रमांक खोमणेमळा शाळेने पटकावला.

मुख्याध्यापक बापूराव खामकर, सहशिक्षिका अनिता कांबळे/माने तसेच शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल त्यांचे तालुका गटविकास अधिकारी राणीताई फराटे, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, सिताराम भुजबळ, केंद्रप्रमुख हनुमंत भुकन तसेच घारगाव ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading