संत तुकाराम महाराज अभंगात एके ठिकाणी म्हणतात “बोलावे बरे बोलावे खरे ! शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगळ! यातुन तुकाराम महाराज सांगतात कि शब्द हे जपूनच वापरा.कारण शब्दांमुळे मंगळही घडत व शब्दांमुळे दंगलही घडते. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आज सातत्याने आठवण होते. कारण हल्ली महाराष्ट्रात बेताल व चुकीच्या वक्तव्याची जणू स्पर्धाच लागली आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.
रोज कुणीतरी उठून इतिहासाची मोडतोड करून आमचे राष्ट्रपुरुषाची बदनामी व अपमान करून समाजात खोटा इतिहास पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत.
छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीमहाराजे, म.फुले, डॉ.बाबासहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महान व्यक्तीने लोककल्याणकारी व समाजोपयोगी महान कार्य करून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे.
अशा आमच्या दैवतांचा रोज कुणीतरी अपमान करतो व प्रकरण अंगाशी आले कि माफी मागून मिटवायचे असे कार्यक्रम हल्ली रोजच चालू आहेत. मग या बेताल वक्तव्य करणार्या विरोधात विविध संघटना मोर्चे, आंदोलने व निषेध करतात.
आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान झालेला कोणीही सहन करू शकत नाही. काही संघटना अशा वाचाळवीराचा आपल्या भाषेत समाचार घेतात. अनेक संघटना यांपासून दूर राहणेच पसंत करतात. विविध संघटनेचे विचार वेगवेगळे असू शकतात याबददल कुणाचाही विरोध नाही.
पण खरा प्रश्न हा आहे या वाचाळवीरांना पोसतय कोण.? या बेताल वक्तव्य करणा-या नालायक.. नीच व्यक्तींना संरक्षण कोण देतय.? शिव शंभू शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहुन त्यांचाच अपमान करण्याची यांची हिम्मत होतेच कशी? कुठली शक्ती यांच्या पाठीशी उभी असते..? हे प्रश्न मनाला नेहमीच पडतात.
या वाचाळवीरावर कडक कारवाई का होत नाही ? महापुरुषांच्या नावाने सत्ता मिळवायची व त्यांचाच होत असलेला अपमान गप्प बसून बघत रहायचे.? राष्ट्रपुरुषांबद्दल अपमानकारक व खोटे वक्तव्य करायची व पुन्हा माफी मागायची जणू काही सर्व पद्धतशीरपणे नियोजन करूनच सामाजिक वातावरण बिघडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार चालू आहे. अशी खात्री वाटू लागली आहे.
भ्रष्टाचार, अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बेकारी, अन्याय अशा मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधन्याकरिता असे प्रकार घडवले जातात की काय..? अशी शंका येवू लागली आहे. अनेक राजकीय नेते ही अशावेळी गप्प राहणेच पसंत करतात.
युवकांना विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बनवून, प्रलोभने देवून युवाशक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर केला जातो आहे. विविध जातीधर्मात भांडणे लावली जातात. विविध राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून सामाजिक वातावरण गढूळ केले जात आहे.
काही संघटना, पक्ष, नेते वाचाळना पाठिंबा देवून त्यांची हिम्मत वाढवत आहेत. जर अशा नालायक, नीच, मूर्ख वाचाळवीराचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त होणार नसेल तर एक दिवस नक्कीच समाजाचा संतप्त उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस अशा नालायक वाचाळवीरांना जनताच रस्त्यावर उतरवून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
मो.9850392414..






Leave a Reply