वंचित बहुजन युवा आघाडीच्या संविधान सप्ताहला तरुणाईचा प्रतिसाद..

दिनांक २७ नोव्हेंबर, अहमदनगर:

वचित बहुजन युवा आघाडी उतर अहमदनगर युवा जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान सप्ताहला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत मकासरे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

त्यांनी नमूद केले की, दिनांक २२ नोव्हेंबर २१ ते २६ नोव्हेंबर २१ पर्यंत संविधान सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सलग सात दिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

नमूद उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व युवा वर्गाचा सक्रिय प्रतिसाद मिळाला. संविधान दिनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केल्याचे मकासरे यांनी सांगितले. दिनांक २६ नोव्हेंबर (संविधान दिन) रोजी पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी तसेच, नायब तहसीलदार, जेष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत सांगता कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी बार्टीचे दिलावर, समता दुत एजाज पिरजादे, वंचितचे युवा शहर अध्यश महेश साळवे, राहुल चदनशिव, सार्थक भागरे, हृतिक जाधव, सनी जाधव तसेच युवा उद्योजक अमोल गायकवाड़, प्रविण ठुबे, सुरज विटणोर, निलेश गहाणे आदीने परिश्रम घेतले.

स्रोत:(युवा जिल्ह्य महासचिव, अप्पासाहेब मकासरे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading