दिनांक २६ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
विधी व सेवा समिती व रयत संकुलाच्यावतीने महादजी शिंदे विद्यालयात संविधान दिन साजरा..
श्रीगोंदा येथील रयत संकुल व विधी व सेवा समितीच्या वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते…
अनेक वर्षाच्या कठोर संघर्षानंतर अनेकांच्या बलिदानानंतर भारताने हे स्वातंत्र्य मिळवले आहे. एक आदर्श राष्ट्र निर्माण व्हावे, या दृष्टिकोनातून संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आदर्श नागरिक या संविधानाचे जतन, मनन व चिंतन करतील अशी संविधानकारांची अपेक्षा होती. म्हणूनच या संविधानाच्या संरक्षणाची व अंमलबजावणीची जबाबदारी नागरिकांवर येते.

म्हणून, संविधानाचा सन्मान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा समितीचे अध्यक्ष मुजीब एस. शेख यांनी केले. रयत संकुल व विधी व सेवा समिती च्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःला शिस्त लावली पाहिजे. आपले आई-वडील व शिक्षक यांचा सन्मान केला पाहिजे. योग्य संस्कार घेऊन एक आदर्श नागरिक बनले पाहिजे. यावेळी संविधानातील उदात्त तत्वांचा परिचय जिल्हा न्यायाधीश नितीन शुक्ल यांनी करून दिला.

दैनंदिन जीवनात सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे हक्क-अधिकार संविधानाने दिलेले आहेत. असे प्रतिपादन ऍड. आचार्य यांनी केले.
यावेळी मंचावर जिल्हा न्यायाधीश नितीन शुक्ल, दिवाणी न्यायाधिश संग्राम शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, वकील संघाचे अध्यक्ष सदाशिव कापसे मंचावर उपस्थित होते.
कर्मवीरगीत सुनील दरेकर व विद्यार्थिनी यांनी गाईले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन हर्षल झगडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला हभप कुंडलीकराव दरेकर, बाजीराव कोरडे, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, मुख्याध्यापक नवनाथ बोडखे, मुख्याध्यापिका वंदना नगरे, रवीशेठ दंडनाईक, ऍड. आचार्य, ऍड. घोडके, महावीर पटवा, ज्योत्स्ना भंडारी, डॉ. विकास सोमवंशी, गीता चौधरी, बोराडे, बाळासाहेब जाधव, प्रा. झिटे, प्रा. खोमणे, प्रा. मखरे , पिटर रणसिंग, रयत संकुलातील सर्व सेवकवृंद ,पत्रकार व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ बोडखे, सूत्रसंचालन विलास लबडे, वसंत दरेकर, सचिन झगडे आभार प्रदर्शन गीता चौधरी यांनी केले.स
स्रोत:(सचिन झगडे, सर)
