दिनांक १२ जानेवारी, श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित केलेल्या शिष्यवृती परीक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील पाचवीच्या सहा व आठवीच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली.

इयत्ता पाचवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत दिव्या अशोक सायंबर ६७ वी, अपूर्वा शरद माळशिकारे १३८ वी, स्नेहा नंदू काळे १६९ वी, स्वप्नाली बाबासाहेब उगले २०६ वी, ओम दत्तात्रय गांगर्डे २७२ वा तर श्रद्धा सीताराम बेरड हि विद्यार्थिनी जिल्ह्यात २८५ वी आली.
त्याचप्रमाणे आठवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत प्रणव अनिल उगले १८६ वा तर मनस्वी मनोज शितोळे २१९ वी आली.
या विद्यार्थ्यांना पाचवीसाठी विभागप्रमुख व वर्गशिक्षक सचिन गारुडकर, मनोज शितोळे, सारिका शितोळे व अशोक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे आठवीसाठी विभागप्रमुख दत्तात्रय हजारे, भाऊसाहेब साठे, अंबादास कोथिंबीरे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिवाजी तापकीर, काकासाहेब वाळुंजकर, प्राचार्य तथा लाईफ मेंबर अविनाश गांगर्डे, पर्यवेक्षक बबन इंगळे, सरपंच बाळासाहेब उगले, चेअरमन व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
