दिनांक ११ जानेवारी, श्रीगोंदा:
श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना अर्थात सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शिगेला पोहोचली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी तालुका दणाणला आहे. आज सकाळीच नागवडे कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदन सादर केले. ज्यात केशवभाऊ मगर यांच्या गटाने ‘राजेंद्र प्रताप’ नावाने ९२ पानी पुस्तक प्रकाशित करून, त्यात विविध आरोप व खुलासे केलेत. तर, यानंतर आज दुपारी आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी केशवभाऊनीं सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली.
आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बबनराव पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी नमूद केले की, श्रीगोंदा सहकारी कारखाना सामान्यांच्या संघर्षातून, श्रमातून अनं त्यागातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे हा कारखाना सर्वसामान्य लोकांचा आहे.

नागवडेंनी नमूद कारखान्याप्रमाणेच त्यांच्या शिक्षण संस्थेतही मोठा भोंगळ कारभार केल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सामाजिक माध्यमांवरील जुन्या बातम्या दाखवून, सभासद व मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सध्या चालू असल्याचे त्यांनी म्हटले. सहकार वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन आ.बबनराव पाचपुते यांनी केले यावेळी केले.
पत्रकार परिषद मध्ये पुढे बोलताना केशवभाऊ मगर म्हणाले की, नागवडे कारखान्यात कोजन, शुगर, मळी, भंगार इत्यादीसह बापूंच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाल्याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. यावर सनदशीर भूमिका घेत, वरील मुद्यांसह छत्रपती शिक्षण संस्थेतील भोंगळ कारभारावर कायदेशीर आवाज का उठत नाही.? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर, केशवभाऊ मगर यांनी त्याबाबत वरिष्ठांकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.

तालुक्यातील सर्व विकास कामांमध्ये आजारी असतांनाही मी सक्रिय आहे. लोकांच्या सुख दुःखातही माझे कुटुंब सक्रिय आहे. तरीही, काही लोकं विरोधाभास निर्माण करण्यासाठी नकोत्या वलग्ना करीत आहेत. सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये “सहकार विकास पॅनल”च्या जाहीरनाम्यानुसार मी केशवभाऊ मगर आणि त्यांच्या सर्व पॅनल सोबत ताकतीने उभा असून, सर्वसामान्यांनी सहकार टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन बबनराव पाचपुते यांनी आयोजित पत्रकार परिषदे मधून केले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी भगवान आबा पाचपुते, आबा नलगे, गणपतराव काकडे, जितुशेठ मगर व संदीप नागवडे सर उपस्थित होते.
स्त्रोत:(पत्रकार परिषद)
