अफाट जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : प्रियंका अजय गाडेकर (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई).

दिनांक १० फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

अफाट परिश्रम, जिद्द आणि संस्कारांच्या आधारावर माणूस स्वतःच्या आयुष्याचे सोने करू शकतो आणि त्यातूनच नवा पिढी निर्माण होईल आणि हीच पिढी खऱ्या अर्थाने देशाला सक्षम रीतीने पुढे घेऊन जाऊ शकेल. असे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मुंबई मंत्रालयातील नवनियुक्त कक्ष अधिकारी प्रियांका अजय गाडेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुभचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी संस्कारांची शिदोरी आणि रयत शिक्षण संस्थेतील संस्कार रयतचा इतिहास, संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला व समाजाला मार्गदर्शक ठरतील. असे उपक्रम रयतच्या माध्यमातून सातत्याने घेतले जातात. त्या उपक्रमांना वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यातून प्रसिद्धी मिळाली पाहिजे असे भाष्य केले.

तसेच तालुक्याचे आमदार व पूर्व मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी नवशिखरे पादाक्रांत करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून काम केले पाहिजे. अंधश्रद्धा न बाळगता प्रयत्नशील राहून संत विचाराने काम केले तर, मानव उत्कृष्ट जीवन प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन केले. इयत्ता दहावीचा विद्यार्थी दीप लगड, बारावी मधील कु. सोफिया शेख यांनी विद्यालयाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हभप कुंडलिकराव दरेकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यालयातील तालुकास्तर, जिल्हास्तर राज्यस्तरावर विशेष गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. गुरुकुल, कला, क्रीडा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एन्एमएमएस परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, आरटीएस, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी, अशा सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २४६ गुणवंतांना ट्रॉफी, मेडल व नोटबुक देऊन सत्कार करण्यात आला.

मंचावर नगरसेविका मनिषा लांडे, सौ. लाढाणे, नगरसेविका सीमा गोरे, माजी उपनगराध्यक्ष राजु गोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य महावीर पटवा, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव जरे, उपप्राचार्य शहाजी मखरे प्राचार्य दिलीप भुजबळ, प्राचार्य गीता चौधरी तसेच, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव राजेंद्र खेडकर, बापूराव औटी,सौ रुपाली दरेकर बी.के. राहींज, सुधाकर जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार राहुल जगताप यांनी विद्यार्थ्यांना तत्पूर्वी भेट देऊन, भविष्यातील परीक्षेसाठी तसेच उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या.

या विविध दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला चार स्टील बाक भेट दिले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरे विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सूत्रसंचालन विलास लबडे आणि सुधीर साबळे, आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांनी केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading