पारगाव.. सुद्रिकेश्वर मंदिरातील ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरी.. प्रकार सीसीटीव्हीत कैद..

दिनांक १२ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील मंदिरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीत सुमारे ३० लक्ष रूपयांचा ऐवज चोरी गेला आहे. संपूर्ण चोरीचा प्रकार CCTV मध्ये कैद झाला असुन, सुद्रिकेश्वच्या मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून चोरट्यांनी पादत्रानासह देव्याच्या गाभाऱ्यात थांबून, टामीच्या सहाय्याने चांदीचे सिंहासन चोरले असल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी मुख्य दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील सुमारे ५० किलो वजनाचे साधरण ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरून नेले आहे.

या घटनेचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेय. तर, घटनेविषयी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास येथील एक व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असता त्यांना मंदिराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन वरून दिली. यावेळी पुजाऱ्याने मंदिरात जाऊन पाहिल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिली. याठिकाणी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले..

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना या प्रकरणी माहिती मिळाल्यावर घटनास्थळी भेट देत पाहणी करत पुढील तपासासाठी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. यानंतर घटनास्थळी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी परिसरातील सीसीटिव्ही चौकशीत तांत्रिक माहिती संकलीत करून तपास सुरू केला. आरोपी लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पारगाव ग्रामस्थ आग्रही झालेत.

स्रोत:(मिळालेली माहिती)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चोरीचा प्रकार..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading