शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार पंकज गणवीर तर, उपाध्यक्ष पदी शितल वेताळ..

दिनांक १ जानेवारी, श्रीगोंदा:

तालुक्यातील ढवळगाव येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीचे पुर्नगठण करण्यात आले असुन, अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार पंकज गणवीर यांची तर, उपाध्यक्ष पदी शितल जनार्धन वेताळ यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

तसेच, या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकांमधून राजू शिंदे, परवीन इसाक पठाण, मोहिनी दादाभाऊ कर्हे, सविता तुषार शिंदे, अनिल बोरगे, बायडाबाई गणेश शिंदे, शिक्षक प्रेमी मधून विद्याधाम प्रशालाचे मा.मुख्याध्यापक राम शिंदे, पत्रकार मधून अमोल बोरगे, ग्रामपंचायत सदस्य मधून बबन शिंदे यांची निवड करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक नंदा ठुबे, मा.उपसरपंच रविंद्र शिंदे, गवराम आढाव सर, दादा कर्हे, गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाळु शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल शिंदे, युनूस पठाण, पालक, शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

आतापर्यंत ढवळगाव मध्ये ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच उपसरपंच निवड, तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक, विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक, आता शालेय व्यवस्थापन कमिटीची निवडणूक संपूर्णपणे बिनविरोध झाली आहे. Journalist Pankaj Ganveer as the Chairman of the Education Committee and Shital Vetal as the Vice Chairman.

ढवळगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. या गावांमध्ये संपूर्ण निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आहेत. यासाठी संपूर्ण गावातील तरुणवर्ग, ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मा.सरपंच विजय शिंदे

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading