दीदी.. दरवाजा उघड..! म्हणत, बळजबरीने त्याने घरात प्रवेश केला.. अनं मंग त्या अल्पवयीन मुलीसोबत घडले असे..!

दिनांक ३१ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील दक्षिणेकडील गावात शेती उपजीविकेचे साधन असलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एका इसमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगसह बालकाचे लैगिंक अपराधापासून संरक्षण कायद्यनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, दिनांक २८ डिसेंUबर रोजी सकाळी ११ चे दरम्यान पीडित मुलीची आई मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेले असताना मुलगी घरात एकटीच होती. सायंकाळी ५ ते ६ चे दरम्यान एक ३० वर्षाचा अनोळखी इसम पीडित मुलीच्या घरासमोर मोटारसायकल वर आला. मोटारसायकलचा आवाज ऐकू आल्यावर पीडितेने थोडा दरवाजा उघडला आणि पाहिले असता सदर इसम त्यांच्याच घराकडे येत असल्याचे तिने पाहिले. त्या इसमाने पीडित मुलीला विचारले की, इकडे एक माझा मित्र राहतो. तो कुठे राहतो..? त्यावेळी पीडितेने सांगितले मला माहित नाही. म्हणत दरवाजा बंद केला.

तरीही तो फोनवर बोलत तिथेच उभा होता. थोड्या वेळाने त्याने पुन्हा पीडित मुलीला आवाज दिला. दीदी दरवाजा उघड..! संबंधित मुलीला वाटले की, हा व्यक्ती आपल्या घरच्या लोकांशी बोलला आहे. त्यामुळे तिने अर्धा दरवाजा उघडला. त्यावेळी दरवाजा पूर्ण ताकतीने लोटून त्याने घरात प्रवेश केला व दरवाजा बंद केला आणि लैगिंक भावनेने अश्लील चाळे करू लागला. त्यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

त्याने एका हाताने मुलीचे दोन्ही हात पकडले व दुसऱ्या हाताने तोंड दाबून दिवानवर ढकलले त्यावेळी पीडित मुलगी आरडाओरडा करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असताना, तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. ती ओरडू नये म्हणून, तिच्या तोंडात बोटे घातली मात्र, मुलीने चावा घेतल्यामुळे हात काढला. आरडाओरड ऐकून त्यांच्या शेजारी राहणारी मुलीची आत्या पळत येऊ लागली. तसेच, पीडित मुलीचे चुलते धावत येतांना खिडकीतून पाहिले आणि खिडकीतून उडी मारून मोटर सायकलवरून पळून गेला.

यानंतर घरच्यानी त्याचा शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. त्यावेळी पीडितेच्या चुलत्याने सदर इसम रोहिदास इधाटे असून, तो कामानिमित्त गावात ये जा करत असतो. तो ज्या मोटारसायकल वर पळून गेला. तिचा नंबर एम एच १२ एल एक्स ५८३२ असून, होंडा कंपनीची शाईन गाडी असल्याचे त्यांनी सांगितले.

काही वेळाने पीडित मुलीचे आई वडील घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार तिने आई वडीलांना सांगितला. त्यानुसार आई, वडीलांनी मुलीसोबत श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले. अनं रोहिदास इधाटे याच्यावर विनयभंगसह बालकाचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. Didi .. open the door ..! Saying, he forcibly entered the house .. Anam Mang happened to that minor girl ..!

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत असून, पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading