श्रीगोंदा तालुका व शहर शिवसेना नूतन कार्यकारिणी जाहीर..

दिनांक: ३१ डिसेंबर, श्रीगोंदा :

जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख शिक्षकांची गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा संपर्कप्रमुख संजयजी खंडागळे यांच्या शुभहस्ते शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी उपस्थित शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, श्रीराम मस्के, रोहन मोरे, निलेश गोरे, नितीन शिंदे सह शिवसैनिक/ युवासैनिक/ महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यकरणी मध्ये शिवसेना श्रीगोंदा तालुका (संघटक पदी) सुरेश देशमुख यांना नियुक्त करण्यात आले. शिवसेना (उपतालुका प्रमुखपदी) निलेश साळुंखे, शिवसेना (उपतालुका प्रमुखपदी) रघुनाथ सूर्यवंशी, शिवसेना (उपतालुका प्रमुखपदी) शरद नागवडे, (अल्पसंख्याक शहर प्रमुख पदी) जमील भाई शेख, (भटक्या विमुक्त जाती जमाती शिवसेना तालुका प्रमुख पदी) सुदाम सावंत, (Shrigonda taluka and city Shiv Sena announces new executive ..) (शेतकरी सेना उपतालुका प्रमुख पदी) शिवाजी राऊत, शिवसेना (शहर संघटक पदी) नितीन गायकवाड, शिवसेना (ओबीसी शहर प्रमुखपदी) अनिल सुपेकर, शिवसेना (उपशहर प्रमुखपदी) संजय नेवसे, शिवसेना (उपशहर प्रमुख पदी) ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, या पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांचे काम पाहून त्यांना कायम करण्यात येणार आहे. असे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्र देण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading