दिनांक ३१ डिसेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीपैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दित सरत्या वर्षात डिसेंबर अखेर पर्यंत गुन्हेगारीचा आलेख ऊँचावला आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत मागील वर्षी सन २०२० साली ७१२ गुन्ह्याची नोंद झाली होती. आता २०२१ साली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फक्त ५९० गुन्ह्याची नोंद झाली आहे. तर, बेलवंडी पोलिसांच्या हद्दीत मागील वर्षी २५० गुन्ह्याची नोंद झाली होती. आता २०२१ साली केवळ २८६ गुन्हे दाखल झाले आहेत. बहुतांशी गुन्ह्याचा तपास लागला आहे. गेल्या वर्षी २०१७ साली खून दरोड्याच्या घटनांनी तालुका हादरला होता.
मात्र यावर्षी यावर मोठ्या प्रमाणात आळा बसवण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, अवैध धंद्याच्या प्रमाणात पोलिसांच्या कार्य क्षमतेवरील शंकेमुळे तालुक्याच्या हद्दीत अवेध धंद्यात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील मागील काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढला होता. या सरत्या वर्ष्याखेर श्रीगोंदा तालुक्यातील दोन्ही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीचा आलेख ऊँचावला आहे. मागील काही वर्षी श्रीगोंदा तालुका खून दरोडे, घरफोडी, चोरी, बलात्कार, विनयभंग सह अपघातासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत.
त्यात विशिष्ट प्रकारे टाकण्यात आलेले. दरोडे आणि त्यात बळी गेलेले नागरिक याचा विचार करता, अनेक गावात या दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली होती. याला मागील वर्षाला काही प्रमाणात आळा बसवता आला आहे. यामध्ये २०२० साली श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये ४ खुनाचे गुन्हे, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी ६ गुन्हे, बलात्काराचे १३ गुन्हे, दरोड्याचा गुन्हा ३, दरोड्याच्या तयारीत ० गुन्हा, जबरी चोरी १३ गुन्हे, ४३ घरफोड्या, एकूण चोऱ्याचे १६० गुन्हे, ७५ दंगे, १५२ दुखापतीचे, विस्वासघात ठकबाजी १७, विनयभंग ५३ पळवून नेणे १६, सरकारी नौकारास मारहाण ११ हयगय मृतू २६ (आकस्मात ९०) तर ५४ जुगाराचे ,२०० दारूबंदीचे गुन्हे दाखल झाले होते.
तर, बेलवंडी पोलिसांच्या हद्दीत खून – ५ खुनाचा प्रयत्न ५, बलात्कार ३, जबरी चोरी ९, ९ घरफोडी, एकूण चोरयाचे ७७ गुन्हे, फसवणूकेचे १, अपघात दुखापत ९ गुन्हे, सरकारी नौकरास मारहाण ६ विनयभंग १९ हयगय मृतू २२ जुगार ५ दारूबंदी ८० असे गुन्हे दाखल झाले आहेत.

तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारी कमी व्हावी. यासाठी दोन वर्षापूर्वी तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा विचार करता दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीत तालुक्यातील गावाचा समावेश करणायत आला. त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा अशी आश्या बाळगली गेली मात्र ती यशस्वी ठरली आहे.
असे म्हणणे वावगे ठरणार नाही मागील वर्ष्यापेक्षा यावर्षी २०२१ साली श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये दोन खुनाचे गुन्हे ४, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी ८ बलात्काराचे गुन्हे ७, दरोड्याचा गुन्हा १, दरोड्याच्या तयारीत १, जबरी चोरी २ गुन्हे , घरफोड्या २९ , एकूण चोऱ्या चे १४४ गुन्हे, ४२ दंगे, १५३ दुखापतीचे, विस्वासघात ठकबाजी १५, विनयभंग ४८, पळवून नेणे १४ सरकारी नौकारास मारहाण ४, हयगय मृतू २६ तर ३३ जुगाराचे दारूबंदीचे १८९ गुन्हे दाखल झाले आहेत तर बेलवंडी पोलिसांच्या हद्दीत ३ खून, खुनाचा प्रयत्न ३, बलात्कार ५, जबरी चोरी ९, दरोड्याची तयारी ०, घरफोडी २० एकूण चोरयाचे गुन्हे, दंगा ४० विस्वासघात ५,पळवून नेणे १२,अपघात दुखापत ६७ गुन्हे, सरकारी नौकरास मारहाण २ विनयभंग २८ हयगय मृतू २० आकस्मित मृत्यू ६० इतर गुन्हे निरंक जुगार २२ दारूबंदी १३०.. असे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख खालावला आहे.
मात्र, अवैध धंद्यांच्या बाबतील तालुक्याचा आलेख उचावलेला दिसत आहेत. तालुक्यातील गुन्हेगारी बरोबर अवेध व्यवसाय मध्ये वाढ होत आहे. धाब्यावर खुले आम मिळणारी देशी वेदेशी मद्य याचा परिणाम दारू पिनाऱ्यावर कोणताही वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. चंदन चोरी, रस्ते लुट, स्वस्तात सोने देण्याच्या नावखाली लुट, विविध तालुक्यातील गुन्हेगार परराज्यात जाऊन गुन्हे करत असल्याचे उघड झाले असताना, येणाऱ्या वर्षात श्रीगोंदा पोलिसांना गुन्हेगारीवर विशेष नजर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. असे तालुक्यातील नागरिकांचे मत आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
