साकळाई उपसा सिंचन प्रकल्प बाबत दिपाली सय्यद यांनी घेतली मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट..

दिनांक ३० डिसेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्या सह नगर तालुक्यातील गावांसाठी लाभदायी साकळाई उपसा सिंचन प्रकल्प बाबत शिवसेना ज्येष्ठ नेते राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याचे मान्य करून ३० वर्ष प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती सिने अभिनेत्री शिवसेना नेत्या सौ.दीपाली भोसले सय्यद यांनी दिली.

सय्यद यांनी काल मुंबईत ना. शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पातील उदासीनता दाखवून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. त्यावर ना.शिंदे यांनी हा प्रश्न सोडवताना शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करण्याचे मान्य केले.

सय्यद पुढे म्हणाल्या साकळाई उपसा सिंचन प्रकल्प बाबत ३ वर्षांपूर्वी मी उपोषण केले होते. त्याचवेळी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले होते. लोकांना पाणी मिळावे, बागायत क्षेत्र वाढावे, हा माझा हेतू होता. पण, राजकारण्यांनी याचे राजकीय भांडवल करत निवडणूकीशी संबंध जोडला. पण, मी देखील श्रीगोंदयात निवडणूक न लढवता माझा हेतू प्रामाणिक होता हे सिद्ध केले.

३ वर्षांपूर्वी मी या प्रश्नी आंदोलन करताच श्रीगोंदा तालुक्यातील नेतेमंडळी मुंबईत बसून, पाठपुरावा सुरू असल्याचे दाखवत होते. हे आता उघड झाले आहे.
रविवारी सौ. दीपाली सय्यद यांनी श्रीगोंदा शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, विविध प्रश्न आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला.

त्यावेळी साकळाई उपसा सिंचन बाबत त्यांनी पुन्हा शब्द दिला आणि काल त्यांनी मुंबईत भेट घेतली. Minister Dipali Syed took up the issue of Saklai Upsa Irrigation Project. Meeting of Eknath Shinde ..

स्रोत:(पत्रकार मुस्ताक पठाण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading