खासदार निलेश लंके यांच्या नागरी सत्कारानिमित्त वही वाटप कार्यक्रम..

दिनांक १० जुलै २०२४, मांडवगण, श्रीगोंदा:

अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार साहेबांची वही तुला करून मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार राहुल जगताप यांनी ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. खासदार साहेबांनी आपल्या भाषणात जनतेला दिलेले साकळाईच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये नॅशनल बँकसाठी आणि ग्रामीण रुग्णालयासाठी खासदारांना निवेदन देण्यात आले, दोन्ही प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे खा.लंके यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून डॉ.सेलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे आणि खादी ग्रामउद्योग चे संचालक अमित जाधव यांचा यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान मांडवगण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शिंदे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम देशमुख यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे सिद्धार्थ घोडके, योगेश देशमुख, माऊली कण्हेरकर, शिवाजी वाघमारे, टिल्लू मनसुके, पप्पू बोरुडे, स्वाधीन मोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading