दिनांक १३ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डॉ. निलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर महिन्याला एका किल्ल्यावर जाऊन स्वच्छता व संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी शिवनेरी किल्ल्यापासून केली असून, पुढील टप्पा पेडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गडावर पार पडला.

या स्वच्छता व संवर्धन मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित राहून धर्मवीर गडाची स्वच्छता केली. तसेच, या गडाच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासंदर्भात उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर अधिवेशनात धर्मवीर गडाच्या संवर्धन व पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडे लक्षवेधी सूचना मांडल्याची आठवण करून दिली. त्या कार्याची दखल घेत आमदार जयंत पाटील यांनी हेमंत ओगले यांचा मावळा पगडी देऊन गौरव केला.

या वेळी खासदार डॉ. निलेश लंके, माजी आमदार राहुल दादा जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सरपंच इरफान पिरजादे, महेश दरेकर, माजी सरपंच भगवान कणसे, गोरख बायकर, सुभान तांबोळी, संदीप वागस्कर यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
