दिनांक ११ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हिंदुहदयसम्राट प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका यांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी हिंदुहदयसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, पत्रकार चंदन घोडके, शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी घोडके, हरिभाऊ काळे, सागर खेडकर, नितीन लोखंडे, योगेश भुतकर, रोहिदास म्हस्के, शिवाजी समदडे, दादाहरी म्हस्के, सुरेश शिंदे, सुशांत भंडारी, राजू तोरडे, गणेश लाटे, सूर्यवंशी, नूतन पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंतीनिमित्त महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक सुधारणा, स्त्रीशिक्षण व समतेचा संदेश देण्यात आला. उपस्थित सर्वांनी महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगीकार करून समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



Advertise..
