अखंड हरिनाम सप्ताहाची टाकळी लोणार येथे भक्तिभावात सांगता; डॉ. निलेश लंके यांचे मार्गदर्शन, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन..

दिनांक १० एप्रिल २०२५,टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा):

प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त टाकळी लोणार येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सुडके महाराज यांच्या भावपूर्ण कीर्तनसेवेद्वारे मोठ्या भक्तिभावाने झाली. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा अर्पण करत संपूर्ण परिसरात भक्तिरस पसरविला.

या सप्ताहात टाकळी लोणारसह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय, महिला भगिनी, ग्रामस्थ, आणि आबालवृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सप्ताहादरम्यान दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, संत शेख महंमद महाराजांच्या पावन भूमीत मुस्लिम बांधवांनी शीरखुर्मा वाटप करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण सादर केले.

या सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉ. निलेश लंके उपस्थित होते. त्यांनी पांडुरंग मंदिरासमोरील सभामंडपासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आणि उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले. यामध्ये सरपंच अर्चनाताई दरवडे, चेअरमन राजेंद्र फंड, उपसरपंच गुलाबभाई शेख, माजी उपसरपंच मारुती भांडवलकर, संदीप काळे, शिवाजी जगदाळे, शिवाजी कुनगर, बाळासाहेब झगडे, शब्बीरभाई शेख, बापूराव फंड, सतीश गायकवाड, आजिनाथ कानगुडे, आप्पासाहेब रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पवित्र सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. सुमंत थोरात, ह.भ.प. बाळासाहेब मते, ह.भ.प. संजय महाराज भांडवलकर, उदमले पोस्टमन, बाळूकाका पोखरणा, भाऊसाहेब मते, अहमदभाई शेख, मोहन कानगुडे यांनी विशेष मेहनत घेतली. सावता बोडखे यांनी स्वादिष्ट महाप्रसादाची जबाबदारी पार पाडली तर गावातील तरुण मंडळींनी उत्साहाने सेवा दिली. शकीला उद्योग समूहाचे देखील या कार्यक्रमास सहकार्य लाभले.

भांडवलकर परिवाराने ५१ ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करत आध्यात्मिक सेवेला नवे परिमाण दिले. एकूणच या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिभाव, सामूहिकतेचा आविष्कार, आणि सामाजिक ऐक्याचा भव्य संगम अनुभवायला मिळाला.

स्रोत:(शिवम दरोडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading