श्रीगोंदा येथे ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती’च्या कोअर कमिटीची निवड; अध्यक्षपदी राजू दादा गोरे..

दिनांक २९ एप्रिल २०२६,श्रीगोंदा (प्रतिनिधी):

श्रीगोंदा शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव २०२६ च्या नियोजनासाठी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष विजय भैया डहाळे, सचिव आदित्य भैया लोखंडे, खजिनदार शेखर भैया मखरे यांची निवड करण्यात आली.

बैठकी दरम्यान जयंती उत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या रूपरेषेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन, “सामाजिक ऐक्य” हा मुख्य संदेश या उत्सवाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार कोअर कमिटीने व्यक्त केला आहे.

प्रत्येक पदाधिकाऱ्यावर उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

या बैठकीस कोअर कमिटीचे सदस्य म्हणून संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे, उदय माने, दिलीप लबडे, उद्योजक बालू दादा मखरे, रमेश आप्पा मखरे, सुयोग धस सर, यशवंत पोटे, जितेंद्र पाटोळे, आरडे मेजर, बाळा काळे, दिपक मखरे यांच्यासह मोठ्या संख्येने शंभूप्रेमी व मित्रपरिवार उपस्थित होता.

नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, श्रीगोंदा शहरात यावर्षीची संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार, असे चित्र दिसत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading