मांडवगण फराटा, ता. २८:
कैफ मुस्ताक शेख (वय २१, रा. नायकवाडी गल्ली, नेवासा, जि. अहिल्यानगर), अब्दूल करीम अशफाक कुरेशी (वय ३२, रा. हमालवाडा, जि. अहिल्यानगर, सध्या रा. श्रीगोंदा), उजेफ अल्ताफ सौदागर (वय २३, रा. सिकीलकर गल्ली, परांडा,जि. धाराशीव व रमेश दत्तात्रेय भोंद्रे (वय १९, रा. धोंगडेवाडी, जि. बीड), अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरे ते काष्टी मार्गावर तांदळी येथे मंगळवारी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. यावेळी हुंडाई कंपनीच्या सेंट्रो मोटारीतून (क्र. एम.एच १२ बी. व्ही ५१३२) या चार जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी वाहन अडवून चौकशी केली असता संबंधितांनी समाधानकारक माहिती देता आली नाही. ते आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी किशोर हनुमंत वाघ यांनी फिर्याद दिली.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)















Leave a Reply