दिनांक १६ एप्रिल २०२६ श्रीगोंदा:
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ अंतर्गत भव्य जाहीर व्याख्यान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
बुधवार, १५ एप्रिलपासून या वैचारिक उत्सवाला सुरुवात झाली असून, २३ एप्रिलपर्यंत ही प्रबोधन यात्रा शहरात विचारांची पेरणी करणार आहे. संत शेख महंमद महाराज पटांगण येथे दररोज सायंकाळी ७:०० वाजता ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे.
सावित्री-फातिमा सद्भावना विचारमंच, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, महात्मा फुले समता परिषद आणि सत्यशोधक समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष, बहुजन समता पक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना, यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
या प्रबोधन यात्रेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत.
बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी व्याख्यानमालेचा प्रारंभ मा. दिपक केदार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला आहे.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ रोजी कार्यक्रमाचे व्याख्याते: मा. अजिंक्य चांदणे साहेब (प्रदेशाध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया).. अध्यक्ष: श्री. विठ्ठलराव वाडगे (संस्थापक-अध्यक्ष, वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्था).. प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते (अध्यक्षा, परिक्रमा शैक्षणिक संकुल), सौ. अनुराधा ठवाळ (माजी पं. स. सदस्या) हे असणार आहेत.
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ (सांगता समारंभ) साठी व्याख्याते: मा. प्रा. सुकुमार कांबळे साहेब (संस्थापक अध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया)
अध्यक्ष: डॉ. रफिक सय्यद साहेब (प्रबोधनकार, पारनेर),प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रणोती जगताप, सौ. शुभांगी पोटे (माजी नगराध्यक्षा, श्रीगोंदा) हे आहेत.
या प्रबोधन यात्रेच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, प्रेरणा सेवा संघटना, ऑल इंडिया पॅंथर सेना, बहुजन समता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना यांसह अनेक संघटनांनी कंबर कसली आहे.
आज दिनांक १६ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. संभाजी आप्पा बोरुडे, सुनिल ओहोळ, नंदूभाऊ ससाने, दीपकशेठ घोडके, वसंतराव सकट व संजय रणसिंग यांनी तालुक्यातील नागरिकांना या वैचारिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात सलोखा निर्माण करणे हाच या प्रबोधन यात्रेचा मुख्य उद्देश आहे,” असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..
















Leave a Reply