#श्रीगोंदा.. प्रस्तापित राजकारण्यांनी ओबीसी/बहुजनांना डावललं..  OBC चे प्रतिनिधित्व असणारी उमेदवारी निवडणूक म्हणुन नाही.. तर, आंदोलनं म्हणुन करणारं..: गोरख आळेकर..

दिनांक ३१ मार्च २०२४, श्रीगोंदा:

शहरातील रहिवाशी आणि विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी असणारे कार्यकर्ते गोरख आळेकर हे ओबीसी/बहुजन बांधवांच्या अस्मितेसाठी दक्षिण नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सदरील उमेदवारी ही obc समाजाच्या प्रतिनिधित्वासोबत एक सामाजिक आंदोलनं म्हणुन करणारं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोरख आळेकर हे अनेक सामाजिक आंदोलनात सक्रीय राहिलेले आहेत. तर, सरस्वती नदी सुशोभीकरण उपक्रमाने त्यांनी जलाशय व नदी प्रदूषण मुक्त करीत वापक लढा उभारला.. ज्याला श्रीगोंदा वाशियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

याचबरोबर सरस्वती नदीवर वैयक्तिक प्रयत्न करून ७ पक्के सिमेंटी बंधारे पुर्ण…, ५ पक्के सिमेंटी बंधारे प्रस्तावित…, रक्तदान शिबीरं.., सर्व रोगनिदान शिबिरं.., सास्कृतीक कार्यक्रम.., बेरोजगरासाठी नोकरी मेळावे.., पाणी प्रश्नावर आवाज उठविला.., महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाची निर्मिती केली.., १०० गट निर्मिती मध्ये सहकार्य.., गोर गरिबांसाठी शासकीय कामात मदत.., कोरोना काळात नवजीवन कोव्हीड सेंटर व संत शेख महंमद महाराज कोव्हीड सेंटर उभारणीत मोलाचा वाटा.., कोव्हीड काळात गरजवंत रूग्णांची सेवा केली.., लिंबु उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले..,

इतिहासात प्रथमच नोंद‌ व्हावी असा लिंबाला बाजार भाव मिळुन देण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली.., ४० हजाराहून अधिक लिंबु उत्पादक  शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी.., अपघात ग्रस्तांना मदत..,  सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य.., ओबीसी मेळाव्याला गावोगावी वाड्या वस्त्यांवर बैठका.., ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून लाक्षणिक उपोषण.., सार्वजनिक प्रश्नांसाठी सलग ५ दिवसाचे उपोषण.., विद्यार्थ्यांच्या काॅलेजमधील अडीअडचणी सोडवण्यास‌ प्राधान्य दिले. अश्या पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक कामांत सक्रिय राहिल्याचे गोरख आळेकर यांनी माध्यमांना सांगितले आहे. तसेच, ओबीसी/बहुजनांच्या उमेदवाराला मत देण्याबाबत सर्वांनी विचार करावा.. जेणेकरून सर्वांना समान न्याय मिळेल.. असेही त्यांनी नमूद केले आहे.

विखे, लंके हे प्रस्तापित आहेत.. आम्हीं obc समाज बांधव या निवडणुकीच्या निमित्ताने अस्मितेची लढाई लढणारं आहोत.. मतदार संघातील obc आणि बहुजन बांधवांना प्रस्तापित राजकारण्यांनी डावललं असल्याचे मत आळेकरांनी व्यक्त केले. लंके तालुक्यात आणि कार्यक्षेत्रात नवीन असल्याने त्यांच्या बाबत बोलणार नाही.

Midc आणि साकळाई पाणी योजना ही निवडणुकांच्या तोंडावर मतदारांचे मन परिवर्तन करणारे मुद्दे आहेत. साकळाई मंजुरीचा मुद्दा मागील निवडणूकीत आमदार पाचपुते यांनी ऐरणीवर आणला होता.. मात्र, त्या साकळाईची परस्थिती पाच वर्षांनंतर आजहि जैसे थे आहे.. तसेच, MIDC मंजुरीचा विषय राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याने तालुक्यातील अनेकांचे मन असल्या घोषणांनी अस्वस्थ झालेली आहेत.

हमी भावापेक्षा.. वीज, पाणी, रस्ते अशी मूलभूत सुविधा उपलब्ध करने.., शेत मालं साठवण्यासाठी वखार व शितगृह बनविणे.., फळ प्रक्रिया उद्योग उभारनीसाठी चालना देण्याचे उद्देश डोळ्यासमोरं असल्याचे मत गोरख आळेकर यांनी मांडले आहे.

ओबीसी समाजावर अन्याय होतोय.., राजकीय वरदहस्त नसल्याने समाजाला राजकीय प्रक्रियेत डावलंले जाते. त्यामुळे मतदार संघातून ओबीसी आणि बहुजन बांधवांच्या अस्मितेसाठी सदरील लोकसभा निवडणुक उमेदवारी म्हणुन नाही.. तर, आंदोलन म्हणुन लढणारं असल्याचे आळेकरांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

स्रोत:(मुलाखत व प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading