फेसबुक पोस्टमुळे भावनांना ठेच: संत शेख महंमद महाराज यांच्याबद्दल अनुचित पोस्ट केल्यामुळे वारकरी संतप्त..

दिनांक१० जुलै २०२४, श्रीगोंदा/इंदापूर:

श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यात भावनिक तणाव निर्माण झाला आहे. अशोक बाजीराव आळेकर, वय ५२, यांच्यासह काही वारकऱ्यांनी फेसबुकवर संत शेख महंमद महाराज यांच्याबद्दल भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या पोस्ट पाहिल्या.

तक्रारदार आळेकर, हे श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यात्रा उस्तव समितीचे उपाध्यक्ष यांनी वारकऱ्यांच्या भावनांवर झालेल्या या आघाताबद्दल अहवाल दिला. इंदापुर येथे पालखी सोहळ्यात सहभागी असताना संदीप चाकणे यांनी फेसबुकवरील पोस्ट पाहिल्या. त्या पोस्टमध्ये संत शेख महंमद महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर होता.

फेसबुकवरील वारकरी संप्रदाय ग्रुपवर मदन जयस्वाल, प्रशांत भालोडकर, आणि दिनेश पाटील यांनी या पोस्ट केल्याचे आळेकर यांनी म्हटले आहे. या पोस्टमध्ये संत शेख महंमद महाराज यांच्या वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या प्रश्नांचा समावेश आहे.

वारकरी संप्रदायाने या बाबतीत तक्रार नोंदवून न्यायाची मागणी केली आहे. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे श्रीगोंदा येथील वारकऱ्यांनी सांगितले आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात..

Leave a Reply