दिनांक १० जुलै २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील दानेवाडी येथे चालु असलेल्या अवैद्य वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या त्या अधिकाऱ्याने आर्थिक तडजोड करून वाळूचा ट्रक सोडल्याची घटना नुकतीच आज थोड्या वेळापूर्वी घडली आहे.
एकीकडे कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला केल्याची घटना मागे काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर महसूल कर्मचारी यांनी कामं बंद आंदोलन केले होते. तर कारवाईत पोलीस घेऊन न गेल्याने त्या कारवाई वर आरोप झाले होते.
त्यातच आज गोपनीय कारवाई करणारा तो अधिकारी कोण? याबाबत चर्चा होऊ लागली आहे. दानेवाडीत चालु अवैद्य वाळू वाहतूक करणारा ट्रक त्या अधिकाऱ्याच्या आर्थिक तडजोडीनंतर सोडल्याने पुन्हा प्रशासनाचा तो गुप्त अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्त्रोत:(अधिकृत माहिती)






