दिनांक २१ मे २०२५, श्रीगोंदा/शिरूर:

शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री ११.३० वाजता शिरूर तहसीलदार बाळासाहेब मस्के व महसूल पथकाने कारवाई करत MH-AD-३९१८ क्रमांकाचा हायवा ट्रक अनधिकृत माती वाहतूक करताना पकडला.

ट्रकमध्ये ५ ब्रास माती आढळून आली असून कोणतीही रॉयल्टी पावती सादर करण्यात आली नव्हती.

माती श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथून रामलिंगकडे नेली जात होती.

ट्रक मालक नामा धावडे याला नोटीस बजावून महाराष्ट्र भूगर्भखनिज अधिनियमांतर्गत २,५१,४५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ट्रक तहसील कार्यालयात जप्त असून यापुढे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
