श्रीगोंदा… वेळूत अनधिकृत मुरूम उत्खनन: प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची हमी..

दिनांक १६ जुलै २०२४, वेळू, श्रीगोंदा:

तालुक्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्रात अनधिकृत रित्या मुरूम उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पर्यावरण रक्षक सोमनाथ कुरुमकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. कुरुमकर यांनी सांगितले की, या उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि याबाबत त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना या अवैध उत्खननाबाबत माहिती विचारली असता त्यांनी नमूद केले की, “आम्ही या प्रकरणी तात्काळ कारवाई करणार आहोत. कोणतेही अवैध काम सहन केले जाणार नाही.” वाघमारे यांनी स्थानिक महसूल विभागाला आदेश दिले आहेत की त्यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन तपासणी करावी आणि अवैध उत्खनन थांबवावे.

सोमनाथ कुरुमकर यांनी प्रशासन व पत्रकारांना दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे की, “जर महसूल प्रशासनाने कारवाई केली नाही.. तर, आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading