डाॅ. सुजय विखे पाटील यांची पंढरपूर वारी..

दिनांक १६ जुलै २०२४, अ. नगर:

बा विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे अशी प्रार्थना करीत डॉ. सुजय विखे पाटील पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक झाले. पंढरपूर येथे जिल्ह्यातून आलेल्या दिंड्यांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी वारकर्यांसमवेत विठूनामाचा जयघोष केला.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी, त्यांनी नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यांमध्ये पायी चालून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला. त्यांनी अहील्यानगर जिल्ह्यातून पंढरपूर येथे आलेल्या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला आणि येथील सोयी सुविधांबाबत माहिती घेतली.

विखे पाटील परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने वारकरी उतरले आहेत. तिथेही डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

राज्यात चांगला पाऊस होवो आणि राज्यातील दुष्काळ हटो.. अशी प्रार्थना आपण पांडूरंगाच्या चरणी केली असून, आषाढ वारीच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading