निलेश लंके दक्षिण अहमदनगर मधून २८९२९ मताधिक्यांनी विजयी.. डॉ. सुजय विखे पराभूत..! उर्वरित उमेदवारांना किती मतं पडली..? पहा..

दिनांक ५ जुन २०२४, श्रीगोंदा:

दक्षिण अहमदनगर लोक सभेच्या निवडणुकीत नीलेश लंके यांनी आपल्या जबरदस्त विजयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या विजयामुळे डॉ. सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव विखे घराण्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

निलेश लंके यांना एकूण ६ लाख २४ हजार ७९७ एवढी मतं मिळाली. तर ते २८ हजार ९२९ मताधिक्यांनी विजय झालेत. डॉक्टर सुजय विखे यांना ५ लाख ९५ हजार ८६८ इतकी मते मिळाली. तर, तिसऱ्या क्रमांकावर श्रीगोंद्याचे नागरिक आणि तरुण पदाधिकारी गोरख आळेकर यांना ४४ हजार ५९७ मतं मिळाली.

वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कोंडीबा खेडकर यांना १३ हजार ७४९,

जाहिरात..

अमोल विलास पाचुंदकर (स्वतंत्र): ५४९३,
भागवत धोंडीबा गायकवाड (समता पक्ष):४९४४,
उमाशंकर श्याम बापू यादव (बहुजन समाज पार्टी):४५३९,
ॲड.जमीर शेख (स्वतंत्र):३९३५,
आरती हलदर (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी):३७९९,
नौशाद शेख (स्वतंत्र):२२२६,
सूर्यभान लांबे (स्वतंत्र):२०९२,
कालीराम पोपळघाट (भारतीय नवजवान सेना):१९८१,
राधाकिसन गावडे (स्वतंत्र):१९४१,
प्रवीण दळवी (स्वतंत्र):१८९८,
मदन सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी):१४५१,
डॉ. कैलास जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी):१४३५,
रवींद्र कोठारी (राष्ट्रीय जनमंच धर्मनिरपेक्ष):१३३३,
ॲड. शिवाजीराव दामाले (सैनिक समाज पक्ष):११०४,
गंगाधर कोळेकर (स्वतंत्र):१०५९,
दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक क्रांती पार्टी):८७३,
भाऊसाहेब वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी):८०१,
अनिल शेखटकर (स्वतंत्र):७०२,
ॲड. महेंद्र शिंदे (स्वतंत्र):६७५,
गफूर शेख (स्वतंत्र):५३१,
रावसाहेब काळे (स्वतंत्र):३७२,
नोटा (वरीलपैकी काहीही नाही):३२८२ अशी उमेदवारांना मतं प्राप्त झालेली आहेत.

बबन पाचपुते यांच्या आगामी आमदारकीला धोका..?

नीलेश लंके यांच्या या विजयामुळे बबन पाचपुते यांच्या आगामी आमदारकीलाही गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मतदारसंघातील मतदारांमध्ये लोकसभेत बदलाची लाट दिसुन आली आहे. आणि लंके यांची लोकप्रियता त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकते..! याबाबत तालुक्यात चर्चा होत आहे.

नीलेश लंके मतदार संघात झंजावात बनुन फिरणार..

आगामी विधानसभेसाठी संबंध दक्षिण नगर मतदारसंघात लंके झंजावत बनवून महाविकास आघाडीसाठी फिरणार असल्याचे लंके समर्थकांनी नमूद केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे सुरू होण्याची शक्यता सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे. लंके यांचे समर्थक त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत त्यांच्या आगामी कार्यकाळाबद्दल उत्साहित आहेत.

या विजयाने दक्षिण अहमदनगरमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे आणि नीलेश लंके यांच्या कार्यकाळात मतदार संघात नवीन पर्व सुरू होण्याची आशा आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..
निलेश लंके यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना पदाधिकारी, समर्थक…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading