महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन..

दिनांक १५ जुलै २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १५ जुलै २०२४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामागील प्रमुख मागण्या महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा.
अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करावेत.

महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी महसूल विभागात सामावून घ्यावेत. वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा. महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे १९०० वरून २४०० करावा. महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करावी. महाराष्ट्र शासन, वित्त विभागाच्या अधिसूचना दिनांक ०३.०२.२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकून यांची वेतन निश्चिती करावी.

महसूल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतूदींनुसार तयार करावी. महसूल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांच्याद्वारे वेतन पडताळणी करावी. अव्वल कारकून संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करावे. नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करावा.

अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदला-बदली धोरणानुसार पदस्थापना करावी. नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून/मंडळ अधिकारी यांच्याकरीता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा प्रमाणे ७०:१०:२० असे करावे. चतुर्थ श्रेणी/शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना तलाठी संवर्गामध्ये २५% पदोन्नती देण्यात यावी. कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी – ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढवावा. या मागण्या आहेत.

या आंदोलनात आदेश जावळे (अध्यक्ष), विकिल बहुरे (उपाध्यक्ष), दिगंबर पवार (सरचिटणीस), शरद झावरे (मार्गदर्शक), बाबासाहेब जाधव, घनश्याम गवळी, शिल्पा कदम (महिला प्रतिनिधी), अलका चव्हाण, अलका कंद (खजिनदार), राजेश सोनवळ, निलेश शेळके, सचिन जाधव, मंगेश ढोमणे, विकास गाडीलकर (वाहन चालक प्रतिनिधी), सतीश घोडके (शिपाई प्रतिनिधी),भरत ससाने, रोहिदास शेलार, फिरके आदिंसह कार्यालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(आंदोलन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading