दिनांक १५ जुलै २०२४, श्रीगोंदा:
ऑल इंडिया आर एम एस अँड एम. एम. एस. एम्प्लॉईज युनियन, बी डिव्हिजन पुणे चे ४५ वे अधिवेशन दिनांक १३ जुलै ते १४ जुलै २०२४ रोजी कॉम्रेड उमाकांत वालगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व कॉम्रेड अरविंद शिवतरे, सर्कल सचिव, महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्या उपस्थितीत पुणे आर. एम. एस. शाखेच्या वतीने व पुणे एन. एस. एच. शाखेच्या सहकार्याने पार पडले. या अधिवेशनात २०२४-२०२६ साठी कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली.
संघटनेच्या विभागीय सेक्रेटरी पदी कॉम्रेड अजित झगडे यांची बिनविरोध निवड झाली. पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे विभागीय सेक्रेटरी म्हणून त्यांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
कॉम्रेड अजित झगडे हे श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील निवासी आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून संघटनेचे सह सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व, कामगार कायद्यांचा मुळातून अभ्यास तसेच जुन्या पेन्शन योजना संदर्भात त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये जागृती केली आहे. एक कर्मचारीभिमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षक नेते सचिन झगडे यांचे ते धाकटे बंधू आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र कॉम्रेड अजित झगडे यांची झालेली निवड सार्थ ठरणार आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी व मान्यवरांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






