आढळगाव ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नामंजूर..

दिनांक १० जुलै २०२४, आढळगाव, श्रीगोंदा:

आज दिनांक १० जुलै २०२४ रोजी ग्रामपंचायत आढळगावमध्ये सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात आली. तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११:०० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली. आढळगाव ग्रामपंचायतमध्ये एकूण १३ सदस्य आहेत, यापैकी १० सदस्यांनी दिनांक ५ जुलै २०२४ रोजी सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे दाखल केली होती.

आज सभेत ९ सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी आपली ओळख आधार कार्ड तपासून पटवली. हजर असलेल्या सदस्यांपैकी उत्तम राऊत, देवराव वाकडे, मनोहर शिंदे, अविनाश मिसाळ, रोहिणी काळाने, लक्ष्मी शिंदे, सीमा बोडके, अंजली चव्हाण, आणि शालन गिरमकर यांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५(३) नुसार एकूण सदस्य संख्येच्या दोन/तृतीयांश इतक्या सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले असल्यास ठराव मंजूर होतो. तथापि, आजच्या सभेत उपस्थित असलेल्या ९ सदस्यांनीच मतदान केल्यामुळे अविश्वास ठराव मंजूर होऊ शकला नाही.

तहसीलदार श्रीगोंदा यांनी ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नामंजूर झाल्याचे याठिकाणी जाहीर केले आहे.

स्रोत:(सभेचा ठराव)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading