दिनांक १० जुलै २०२४, श्रीगोंदा:
९ जुलै रोजी सकाळी ९:३० वा. चे सुमारास सांगोला येथून अविनाश साहेबराव मिसाळ यांची ब्रिझा गाडी क्रमांक MH १६ BZ ०४५८ मध्ये काही सदस्य पंढरपूर, सोनारी, करमाळा मार्गे आष्टी येथे जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला.
या गाडीमध्ये अविनाश साहेबराव मिसाळ, लक्ष्मी शिंदे यांचा मुलगा सतिष अनिल शिंदे, मनोहर दिलीप शिंदे, नितीन बन्सी गव्हाणे व इतर सदस्य प्रवास करत होते. संध्याकाळी ५:३० वा. चे सुमारास माहिजळगाव बायपास जवळील बस स्टॅण्डजवळ चहा पानाच्या दुकानावर थांबल्यानंतर दोन अज्ञात कारांनी त्यांना थांबवले.
अविनाश साहेबराव मिसाळ हे ड्रायव्हर सिटवर होते व इतर सदस्य गाडीच्या पाठीमागे होते. दोन अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ग्रा. पं. सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना त्यांच्या वेरना गाडीत बसवले.
वेरना गाडीमध्ये बसलेली व्यक्ती त्यांच्या गावचा सरपंच शिवप्रसाद भाऊसाहेब उबाळे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सुद्धा नितीन बन्सी गव्हाणे व गाड्या मिळून आल्या नाहीत.
नितीन गव्हाणे यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवप्रसाद भाऊसाहेब उबाळे व इतर अज्ञात इसमांविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अपहरणाचा मुख्य कारण ग्रा. पं. ठराव मंजूर होऊ नये म्हणून केलेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्रोत:(फिर्याद)






