दिनांक: ३० डिसेंबर, श्रीगोंदा
• बबनराव पाचपुते गट एकसंघच
• अण्णा असते तर विरोधकांची पळताभुई थोडी झाली असती •
दिनांक ३० डिसेंबर,श्रीगोंदा:
स्व. सदाशिव पाचपुते यांचे नाव पुढे करून नागवडे सहकारी कारखान्यात सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव विरोधकांमार्फत आखला जात आहे. हा डाव सुज्ञ सभासद निवडणुकीत हाणून पाडतील. सदाण्णा आज असते तर, विरोधकांची पळताभुई थोडी झाली असती. हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे. बबनराव पाचपुते गट हा एकसंघ आहे आणि तो यापुढे ही कायम राहील यात कसलीही शंका नाही. असे मत माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व काष्टीचे उपसरपंच सुनील पाचपुते यांनी व्यक्त केले.

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. यात सदाण्णांना मानणारा वर्ग नागवडे यांना मदत करणार असल्याचे चर्चा पेरली गेली, यात कसले ही तथ्य नसल्याचे सांगत नाहाटा व पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले. यामध्ये म्हटले आहे की, ” विधानसभा निवडणुकीत काहीच ठरले नसताना हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने साक्ष काढणे हे नैतिकतेला धरून नाही.
विधानसभा निवडणुकीत नागवडे हे सत्तेच्या मोहाने भाजप मध्ये आले होते. सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा काँग्रेस मध्ये गेले. विधानसभेला नागवडे यांना पाचपुते यांनी भाजप मध्ये स्वीकारले हा मनाचा मोठेपणा होता. सदाण्णा या सगळ्या प्रक्रियेचे एक भाग होते. आज राजकीय स्वार्थासाठी कोणीही असल्या वावड्या उठवू नयेत.”

स्व. सदाशिव पाचपुते यांनी बबनराव पाचपुते यांचे नेतृत्व शिरसावंद्य मानून समाजकारण व राजकारण केले. बबनराव पाचपुते यांनी घेतलेल्या भूमिकेशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. बबनराव पाचपुते यांच्या प्रति असलेले अण्णांचे प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. बबनराव पाचपुते यांना दैवत मानत स्वामिनिष्ठा काय होती, हे उभ्या तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे पाचपुते गटात कोणीही कुंभा कालवून राजकीय स्वार्थ साधण्याचे पाप करू नये. अशी प्रतिक्रिया बाळासाहेब नाहाटा व सुनील पाचपुते यांनी व्यक्त केली.
दोन गट,तीन गट असले आमच्याकडे चालत नाही.
पाचपुते यांचा दुसरा गट असे करणार, तसे करणार हे काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी केलेला उद्योग आहे. गेली चाळीस वर्षे आपली भूमीका तालुक्याला माहिती आहे. आमच्याकडे दोन- तीन गट असले काही चालत नाही. आमची वज्रमूठ कधीच सुटणार नाही. माझा भाऊ जाऊन वर्षे झाले नाही, अश्या परिस्थिती मध्ये आमच्यात बेबनाव असल्याची चर्चा करून, राजकीय हित साधण्याचे पाप करू नये. नागवडे कारखान्या बाबत सर्व काही ४ जानेवारीला आपल्या समोर येईल. बबनराव पाचपुते. (आमदार, श्रीगोंदा विधानसभा)
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
