श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट)च्या सभासद नोंदणी अभियानाचा भव्य शुभारंभ.

दिनांक २२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित दादा गटाच्या वतीने आज श्रीगोंदा येथे भव्य सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती.

सभासद नोंदणी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. अशोक सावंत, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे, राज्य बाजार समितीचे सभापती श्री. बाळासाहेब नाहटा, युवती प्रदेश अध्यक्षा संध्याताई सोनावणे, तालुकाध्यक्ष श्री. भगवानराव पाचपुते, श्री. डी. आर. शेंडगे, श्री. आनंद लहामगे, महिला जिल्हा अध्यक्षा निंबाळकर ताई, युवक जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या अभियानाद्वारे अजित दादा गटाचे संघटन बळकट करण्याचा आणि पक्षाची मुळे गावागावात रोवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या विचारसरणीवर प्रकाश टाकत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, नोंदणी प्रक्रियेला जोरदार सुरुवात झाली आहे. यावेळी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने नविन सदस्यांनी पक्षात प्रवेश केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading